इंदापूर शहरातून तुतारीचा जोरदार प्रचार सुरू! ८०% मतदान तुतारीलाच होणार! -भरत शेठ शहा
इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर शहर व तालुक्यातून तुतारीचा जोरदार प्रचार सुरू आहे. इंदापूर शहरातून तुतारीचा प्रचाराचा दुसरा दिवस आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते भरतशेठ शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार प्रचार करीत आहेत.
त्यामुळे इंदापूर शहरातून तुतारीला ८० टक्के मतदान होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
इंदापूर शहराध्यक्ष इम्तियाज अली काझी म्हणाले की , सध्याची निवडणूक ही जनतेने हाती घेतली असून तुतारीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून इंदापूर शहरातून लीड मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यानंतर नुकतेच भाजपला राम राम ठोकणारे आणि शकीलभाई सय्यद म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना २ लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल. त्यातच इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना १ लाखापेक्षा जास्त मतदान मिळेल. सध्याची निवडणूक भ्रष्ट पुढारी विरुद्ध जनता अशी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते भर उन्हात प्रचार करीत आहे. त्यामुळे इंदापूर शहरातून सुप्रिया सुळे यांना ८० टक्के मतदान होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
यावेळी इंदापूर शहरातील महतीनगर, श्रीराम सोसायटी,दत्तनगर, महात्मा फुले नगर व शहा मंगल कार्यालय आदी भागातून प्राचाराला सुरुवात केली आहे.
यावेळी अरबाज शेख ,गणेश महाजन ,संमद सय्यद, बापू जामदार, संजय (डोनाल्ड) शिंदे,अनिल ढावरे,गणेश देवकर, श्रीकांत मखरे, अजिंक्य ढहाणे, सुनील तळेकर, इंदापूर महिला शहराध्यक्ष रेश्मा शेख, तम्मना शेख, विजया कोकाटे , अजय पारसे, अमोल माने आदी प्रचारप्रमुख होते.