इंदापूर तालुक्यात वैशाख वणवा भडकला!
वडापुरीचे तापमान @४१ कडे!
ऊन सावलीच्या विचित्र खेळाने नागरिक हैराण!
वडापुरी( प्रतिनिधी):
इंदापूर तालुक्यात वै शाख वणवा भडकला इंदापूर तालुक्यात वै शाख वणवा भडकलाआहे.तालुक्यात विदर्भा सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.वाढत्या तापमानामुळे इंदापूरकर पुरते हैराण झाले असून नागरिकांना दुपारच्या वेळेस बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. वडापुरीचे तापमान ४२ कडे गेले असून तालुक्यात उष्माघाताची परिस्थिती झाली आहे.इंदापूर तालुक्यात उकाडा पुन्हा वाढू लागलाआहे.काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे इंदापूर कर सुखावले असतानाच गारवा संपून सूर्य पुन्हा आग ओकू लागला आहे.ठरेल थंडाव्यासाठी नागरिक शीतपेय, आईसक्रीम, सरबत, यांचा आधार घेणे सुरू झाले आहे.दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत असून लोक घराबाहेर सायंकाळी पाचच्या दरम्यान बाहेर पडत आहे.उन्हामुळे बाजारपेठेवर परिणाम झालेला दिसून येत आहे.उजनीचे पाणी साठा कमी होत चालला आहे.तसेच गावातील असणारी पाण्याची तळी अटत चालली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.