इंदापूरचे भरतशेठ शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश!

इंदापूरचे भरतशेठ शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन तथा मा. उप नगराध्यक्ष भरत शेठ शहा यांनी राष्ट्रवादी काँगेस पक्ष शरदचंद्र पवार गटात आज १६ एप्रिल रोजी इंदापूर येथील वाघ पॅलेस येथे प्रवेश केला आहे.

भरत शेठ यांच्या पक्ष प्रवेशाने इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

शहा यांचे तालुक्यात तसेच इंदापूर खूप मोठे राजकीय वलय आहे.शहा हे इंदापूर शहरातील व्यापारी वर्गाचे अध्यक्ष आहेत. शहा यांची नाळ ही सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याबरोबर जोडली गेली आहे. त्यामुळे इंदापूर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.आगामी विधान सभा व इतर राजकीय निवडणुका लक्षात घेऊन हा प्रवेश मनाला जातो.

इदापूर नगरपालिकेत शहा यांच्या वहिनी सौ. अंकिता शहा या इंदापूर नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्ष आहेत. त्यांनी इंदापूर शहरात अनेक विकासाची कामे करून शहराचे नाव देशाच्या राजकीय पटलावर उमटवली आहे.स्वच्छ भारत अभियानामध्ये इंदापूर शहराला राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत.भरत शेठ शहा कधी काळी हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. परंतु काही राजकीय मतभेदांमुळे त्यांच्यामध्ये दुरावा आला. त्यानंतर भरत शेठ हे काही स्थिर होते. त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नव्हती.

मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहा परिवाराची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. बहुतेकांनी शहा अजित पवार गटात गेल्याची चर्चा केली. परंतु त्यांनी आजच्या पक्ष प्रवेशाने सगळ्या चाललेल्या चर्चेला विराम दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!