कृषी खात्याची सूत्रे बदलणार? दत्तात्रय भरणे आघाडीवर! चक्रव्यूहची बातमी पुन्हा सत्य ठरली!
पाक्षिक चक्रव्यूह विशेष
कृषी खात्याची सूत्रे बदलणार? दत्तात्रय भरणे आघाडीवर! चक्रव्यूहची बातमी पुन्हा सत्य ठरली
मुंबई/पुणे प्रतिनिधी |राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत असलेली बाब अखेर उघडकीस येऊ लागली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्रालय बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, हे खाते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवले जाणार आहे, अशी खात्रीलायक माहिती “चक्रव्यूह”च्या वृत्तप्रतिनिधींना मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर दत्तात्रय भरणे यांनी दिलेलं सूचक आणि बहुचर्चित विधान राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरत आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की –
“कृषी खात्याबाबत अद्याप मला अधिकृत माहिती नाही. मात्र, बारामतीकर न मागता सगळं देतात. मला कारखाना, जिल्हा परिषद, आमदारकी आणि मंत्रीपद… ही सगळी उत्तरदायित्वं त्यांनी न मागता दिली आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना काय करायचं हे ठरवता येतं. योग्य वेळी कळवतील, तेव्हा मी तुमच्याशी बोलेन.”
चक्रव्यूह’चं राजकीय भाकीत पुन्हा एकदा अचूक!
याच संदर्भात ‘चक्रव्यूह’ने गेल्या अंकात दिलेली बातमी आज वस्तुनिष्ठपणे खरी ठरली आहे. कोकाटे यांच्यावर पक्षांतर्गत नाराजी असल्याच्या हालचाली आणि भरणे यांचं संभाव्य खातेबदल याबाबत आमच्या प्रतिनिधींनी दिलेली पूर्वसूचना आज राज्यातल्या इतर माध्यमांनाही पुन्हा उजेडात आणावी लागली.
कोकाटेंचा राजीनामा? की खाते बदल?
पक्षांतर्गत कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
अजितदादांचा कार्यशैलीत विश्वासू, प्रत्यक्ष कृती करणारे नेते प्राधान्य
कोकाटेंची ऊर्जा आणि धोरणं कृषी क्षेत्रात अपुरी ठरत असल्याची चर्चा
त्यामुळे खाते अदलाबदल निश्चित, असं अनेक सूत्रांचं मत
भरणे: ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा
दत्तात्रय भरणे हे सातत्याने ग्रामीण आणि शेतकरी प्रश्नांवर आपली भूमिका प्रभावीपणे मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात. बारामतीकरांशी असलेली त्यांची जवळीक आणि पक्षनेतृत्वाशी असलेलं प्रामाणिक नातं हेच त्यांच्या या पदावर येण्यामागचं मुख्य कारण मानलं जात आहे.
राजकीय विश्लेषकांचं मत:
“ही नेमणूक केवळ खातेबदल नसून, ही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाचा विश्वास जिंकण्याची रणनीती आहे. भरणेंच्या नावाने ही जबाबदारी यशस्वी ठरू शकते.”
राज्याच्या कृषी खात्याच्या नेतृत्वात मोठा बदल निश्चित वाटतो आहे. भरणेंच्या सूचक वक्तव्यामुळे आता केवळ अधिकृत घोषणाच बाकी आहे. ‘चक्रव्यूह’च्या पुढाकाराने बातमीचं सत्य पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे – आणि हेच आमचं सामर्थ्य