लहानग्यांना शालेय साहित्य व शुभ्र वस्त्रांचे बक्षीस – “बुद्ध की और चलो” उपक्रमात प्रेरणादायी धम्म संस्कार वर्ग
लहानग्यांना शालेय साहित्य व शुभ्र वस्त्रांचे बक्षीस – “बुद्ध की और चलो” उपक्रमात प्रेरणादायी धम्म संस्कार वर्ग
इंदापूर(प्रतिनिधी):श्रावण पौर्णिमेनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२५-२६ तर्फे बुद्ध विहार येथे “बुद्ध की और चलो” या उपक्रमांतर्गत बाल संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले. धम्मा वंदना व त्रिशरण-पंचशील पठण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष कीर्ती कुमार वाघमारे यांनी लहानग्यांना शालेय साहित्य व बुद्ध पूजेसाठी आवश्यक शुभ्र वस्त्रांचे बक्षीस दिले.
बुद्ध पूजेचा मान बापू मुकादम मखरे व पत्रकार शिवाजी शिंदे यांना मिळाला. यावेळी शिवाजी शिंदे यांनी बालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आरपीआय पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी मखरे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी तानाजी मखरे, उद्योजक सोमनाथ मखरे, अमित मखरे तसेच दादा साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन नवनाथ मखरे, अरविंद मखरे, उमेश मखरे व रोहित मखरे यांनी केले. समाजातील माता-भगिनींचा सन्मान करण्यात आला व लहानग्यांना खाऊ वाटप करण्यात आले. धम्म संस्कार वर्गाचे सुंदर व प्रभावी संचालन बौद्धाचार्य प्रा. बाळासाहेब मखरे यांनी केले. त्रिशरण-पंचशील व धम्मा वंदनेने वातावरण आनंदमय व प्रेरणादायी झाले.