चलो बुद्ध की और अभियानाला अप्रतिम सुरुवात मा.नगरसेविका सौ. वर्षाताई मखरे व समाजसेवक सुधीर मखरे तसेच उमेश मखरे व त्यांच्या पत्नी सौ.मायाश्री मखरे यांच्या हस्ते धम्मपूजा संपन्न!

चलो बुद्ध की और अभियानाला अप्रतिम सुरुवात

मा.नगरसेविका सौ. वर्षाताई मखरे व समाजसेवक सुधीर मखरे तसेच उमेश मखरे व त्यांच्या पत्नी सौ.मायाश्री मखरे यांच्या हस्ते धम्मपूजा संपन्न!

इंदापूर(प्रतिनिधी): डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती२०२५-२०२६ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘चलो बुद्ध की और ‘ अभियानाला अप्रतिम सुरुवात झाली असून ही उद्याची धम्म क्रांतीची नांदी असेल असे मत नगरसेविका वर्षाताई सुधीर मखरे यांनी व्यक्त केले.

तर चलो बुद्ध की और या अभियानाने समाजातील लहान मुलांवरती धम्म संस्कार होऊन उद्याची भावी यशाच्या शिखरावर पोहचल्या शिवाय राहणार नाही आणि समाजातील बौद्ध धम्माची प्रतिमा आणखीउंचावेल तसेच धम्म चळवळ तळागाळात पोहचवण्याची आज काळाची गरज आहे.रबिवलेला उपक्रम स्तुत्य आहे.येणारी भावी पिढी या धम्माच्या अचारणानुसर सुसंस्कृत व संस्कारक्षम बनेल असा मी आशावाद करतो.सामाजिक परिवर्तन करायचे असेल तर अंधश्रद्धा मुक्त , निर्व्यसनी व निस्वार्थी युवक व युवती घडविले पाहिजे यासाठी प्रा. बाळासाहेब मखरे यांनी संस्कार वर्ग सुरू केले आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते सुधीर मखरे यांनी व्यक्त केले.

यावेळी बौद्धाचार्य प्रा. बाळासाहेब मखरे यांनी धम्म वंदना , त्रीसरण व पंचशील घेऊन धम्म पूजा संपन्न केली.

यावेळी बौद्धाचार्य मखरे म्हणाले की, समाजातील बौद्धिक स्तर खलावलेला असून तो उंचावण्यासाठी लहान मुलांवरती बाल संस्कार होणे गरजेचे आहे त्यामुळे हे अभियान निरंतर चालू ठेवणे आवश्यक आहे तरच उद्याचा बौद्ध धम्म टिकेल असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.यावेळी उमेश मखरे व त्यांच्या पत्नी सौ मायाश्री मखरे यांनी देखील धम्म पूजा केली.

यावेळी शिवाजी वामन मखरे, नगरसेविका सौ.राजश्रीताई मखरे ,प्रा.अशोक मखरे , संदीपान कडवळे,सुहास मोरे गुरुजी, बंटीभाऊ सोनवणे,हनुमंत कांबळे, सुहास मखरे,शिवाजी तानाजी मखरे, महेश सरवदे, हनुमंत मखरे, स्वप्नील मखरे, बोधिसत्व मखरे, अविनाश मखरे, पिंटू मखरे, अण्णा साबळे, दादासाहेब मखरे, मिसाळ, जनार्दन खरे,अनिल मखरे, यशपाल सरवदे, आदी उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष नवनाथ मखरे यांनी केले तर सूत्रसंचालन अरविंद मखरे यांनी केले.आभार प्रदर्शन किर्तीकुमार वाघमारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!