खुळे चौकातील लाखो रुपयांचा सिंह जखमी!
खुळे चौकातील लाखो रुपयांचा सिंह जखमी
इंदापूर (प्रतिनिधी): शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
खुळे चौकात चौक सुशोभिकरण करण्यात आले आहे. या चौकात वनराजाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. लाखो रुपये खर्च करून ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे. १७ एप्रिल २०२२ रोजी या प्रतिकृतीचे उद्घाटन खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु कालावधीतच अंदाजे १५लाखांच्या सिंहाला जखम झाली आहे.सिंहाच्या मागील बाजूस डाव्या पायाला पंजाजवळ भला मोठा काळा डाग पडला असून सिंहाच्या या प्रतिकृतीचा हळू हळू रंग उडून सिंह काही दिवसातच म्हातारा होईल असे वाटत आहे.तसेच त्याच्या बाजूने निर्माण केला गेलेला कठडा बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून ते कधी पडेल याची शाश्वती नाही.
या स्मारकाभोवती अस्वच्छता आहे. कडू गवत, शेवरी व रानटी गवत यांनी प्रतिकृतीला वेढा घातला आहे.
इंदापूर तालुक्यात मा. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे २हजार कोटींचा निधी आणून तालुक्यात विकासाची गंगा वाहत ठेवली. तालुक्यातील लोकांनी भरणे यांना आपल्या हृदयात स्थान दिले आहे.ते कधीच ढळणार नाही.त्यामुळे तालुक्यात भरणे यांचाच बोलबाला आहे.
परंतु भरणे यांनी आपल्या कामाच्या व्यापातून थोडेसे लक्ष घालावे कसूर असणाऱ्यांना धडा शिकवावा असे मामाप्रेमी यांनी आपले मत मांडले आहे.
इंदापूर चौक सुशोभीकरण कामे सुमारे १कोटी ६८ लाख २७ हजाराची कामे तरी आहेत का ? असा सवाल सामान्य जनतेतून केला जात आहे.
असं म्हटलं जातं की एकदा का भ्रष्टचाराचा भस्मासुर बोकाळला की, तो भस्म केल्याशिवाय राहत नाही. असच काहीसं चित्र या सुशोभीकरणा मध्ये नसावं असही बोलले जात आहे.ज्यांनी हे काम घेतले ते निकृष्ट दर्जाचे म्हणावे लागेल.सदरचे काम व्यवस्थित झाल्याचे दिसून येत नाही असेही जनतेतून बोलले जात आहे.
सदर कामे कोणत्या निकषांवर आधारलेली आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच माहिती असावे असेही जनतेतून बोलले जाते आहे.