बावडा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन! आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिल्या शुभेच्छा!!
बावडा(प्रतिनिधी): रमजानच्या पवित्र महिन्यात आज बावडा ता.इंदापूर येथील जामा मस्जिद या ठिकाणी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना चालु असून या निमित्ताने समस्त समाज बांधवांच्या वतीने बावडा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार भरणे यांनी आवर्जून उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा.जि.प.सदस्य प्रतापराव पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील,श्रीमंत ढोले सर,उमेश घोगरे,हनुमंत कोकाटे,सुरेश शिंदे सर,विजय घोगरे,संग्रामसिंह पाटील,अभिजीत घोगरे,तुकाराम घोगरे,दत्ता
घोगरे,अजित टिळेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थितांना शुभेच्छा देताना आमदार भरणे म्हणाले की,सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना चालू असून या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित येऊन एकमेकांच्या सणा-वारामध्ये सहभागी होऊन शुभेच्छा देत असतो.हा आप-आपसातील बंधुभाव असाच टिकला पाहिजे ही ख-या अर्थाने आपल्याला शिकवण असल्याचे सांगत त्यांनी मुस्लीम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
श्री.भरणे पुढे म्हणाले की,बावडा गावातील समस्त समाज बांधवांनी या इफ्तार पार्टीचे केलेले आयोजन अतिशय स्तुत्य असून यामध्ये आपण सर्वजण सहभागी झाल्याने मनापासून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सध्या सभोवताली जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करू पाहणारी प्रवृत्ती फोफावत आहे.परंतु आपण गुण्यागोविंदाने एकत्रित राहणारे आहोत,एकमेकांच्या सुखा- दुःखात सहभागी होत असतो.त्यामुळे आपल्यातील बंधुभाव व एकोपा असाच टिकून राहिल हा विश्वास व्यक्त करून त्यांनी पुढे सांगितले की, मुस्लिम समाजाच्या विकासासाठी आपण नेहमीच आग्रही असतो.व भविष्यातही जिथे कुठे तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी मदत लागेल तिथे सर्वोतोपरी मदत करण्याचा शब्दही यावेळी भरणे यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहरूख जामदार,जाकीर शेख,युसूफ शेख,अस्लम मुलाणी,युन्नुस मुलाणी आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.