तीर्थक्षेत्र लुमेवाडी परिसर विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार- आमदार दत्तात्रेय भरणे तीर्थक्षेत्र विकासासाठी ५० लाख मंजूर

आमदार दत्तात्रय भरणे यांनी सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण करून घेतले दर्शन

दर्गा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी ५०लाखांचा निधी व लुमेवाडी ते बंधारा रस्त्यासाठी ५० लाख निधी मंजूर करणार अशी ग्वाही

  बावडा (प्रतिनिधी): तीर्थक्षेत्र लुमेवाडी तालुका इंदापूर येथील हाजी-ए-मिल्लत सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपुरी बाबा यांचा उरुस शुक्रवार दि. ६ऑक्टोंबर ते ८ऑक्टोंबर दरम्यान चालु आसुन शनिवार दि.७ऑक्टोंबर रोजी मुख्य ऊरसा दिवशी सायंकाळी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी या उरुसा निमित्त सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण करून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

लुमेवाडी येथील जोधपुरी बाबांच्या यात्रे निमित्त भाविकांच्या जनसमुदाया समोर बोलत असताना दत्तात्रय भरणे म्हणाले की मला आज बाबांच्या पावन भूमीमध्ये आनंद होत आहे . माझा एक स्वभाव आहे की गोरगरीब व सर्व लोकांसाठी जेवढी मदत करता येईल असा माझा प्रयत्न नेहमीच असतो लोकांचे भल करता येईल , लोकांमध्ये जेवढ जाता येईल तेवढाच मला आनंद होतो .

 मागासवर्गीय दलीत वस्तीमध्ये कॉंक्रिट रस्ता कधी होता का आज बाबांच्या साक्षीने सांगतो की संपूर्ण दलित वस्ती सुधारण्यासाठी जेवढे जास्त प्रयत्न करता येईल तेवढा इथून पुढेही मी विकास निधी कमी पडु देणार नाही. तालुक्यातील जनतेने माझ्यावर दिलेला विश्वास याचा कधीच विसर पडू देणार नाही असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी आजी ,माजी, सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य भाविक भक्त ,,व दर्गा कमिटी आणी महीला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    मोठ्या भक्ती भावाने हा उरूस सालाबाद प्रमाणे साजरा होत असतो. बाबांच्या दर्ग्यावर विद्युत रोषनाही मोठ्या उत्साहात करण्यात आलेली आहे. मिठाई व खेळणी यांचे स्टॉलचा बहुसंख्येने जास्तीत जास्त भाविक भक्त याचा आनंद घेत आहेत. बाबांच्या उरसासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेत आहेत . यात्रा कमिटीच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी येऊन नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घेतला.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,बाबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आसल्यामुळे दुसऱ्यांदा आमदार होऊन जनतेची सेवा केली याचा मला आज आनंद आहे.

तीर्थक्षेत्र लुमेवाडी परिसर विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गावातील ग्रामस्थ व भाविक आणि नागरीकान सोबत त्यांनी संवाद साधला.मिठाई व खेळण्याची खरेदी करून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लहान बालकांना मिठाई व खेळण्याचे वाटप करण्यात आले . ऊरसाच्या शेवटच्या दिवशी महा प्रसाद घेऊन यात्रेची सांगता होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!