शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांचा इंदापूर तालुका दौरा

इंदापूर प्रतिनिधी (शिवाजी शिंदे)

दि.२४: खासदार सौ. सुप्रिया सुळे व आमदार दत्ता भरणे यांचा इंदापूर तालुका दौरा आयोजित झालेला आहे.

सकाळी मौजे कुंभारगाव येथे सकाळी ९.००वा.पर्यटन विकासाबाबत चर्चा होणार असून याबाबत गावातील नागरिकांसोबत माहिती देवाणघेवाण करणार आहे.

यानंतर गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे.यानंतर थेट कुरवली येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सकाळी ११.३०वा होणार आहे.

येथून त्यांचा दौरा  वालचंदनगर येथे आपला मतदार संघ, आपला अभिमान या संदर्भात दु.१. वाजल्यापासून ते २.३० पर्यंत मीटिंग बोलावली आहे. दू.२.३० दरम्यान वालचंदनगर येथे मीटिंग आयोजित करण्यात आली आहे.

यानंतर माळवाडी नं.१ व २ येथे दु. ठीक ४.०० वा  विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे.यानंतर जाहीर सभा केली आहे.याच ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!