खासदार सुप्रिया सुळे यांच्या आदेशाकडे इंदापूरच्या कार्यकर्त्यांकडून दुर्लक्ष..? संविधान स्तंभाची दुरुस्ती केलीच नाही.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या आदेशाला कार्यकर्त्यांकडून केराची टोपली?

इंदापूर( प्रतिनिधी): खासदार सुप्रिया सुळे यांच्या खासदार निधीतून इंदापूर शहरातील अकलूज – बारामती चौकात संविधान स्तंभ उभारलेला आहे.

आजमितीला या स्तंभाची दुरावस्था झालेली आहे.अनेकवेळा या संदर्भात वारंवार बातम्या येऊनही संविधान स्तंभाकडे दुर्लक्ष केले.इंदापूरच्या मागील दौऱ्यादरम्यान एका पत्रकाराने सुप्रिया सुळे यांना संविधान स्तंभाच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल सांगितल्यानंतर ताईंनी तालुकाध्यक्ष व इंदापूर शहरातील कार्यकर्ते यांना सूचना करत तत्काळ संविधान स्तंभाची डागडुजी करण्यात यावी असे आदेश दिले.कार्यकर्त्यांनी खासदार असेपर्यंत नुसत्या होकारार्थी माना डोलावल्या, खासदार साहेबा तेथून गेल्यानंतर स्तंभाची डागडुजी करणारे कार्यकर्ते परत संविधान स्तंभाकडे फिरकलेच नाहीत. आजही स्तंभ दुरावस्थेत तसाच आहे. कार्यकर्त्यांनी मात्र ताईंच्या आदेशाला केराची टोपली दाखवली कि काय असा सवाल निर्माण झाला आहे. संविधान स्तंभाची दुरुस्ती केलीच नाही. कदाचित ताईंचा आदेश विसरून गेले असावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!