श्रीमती प्रतिभाताई गारटकर व डॉ.लहू कदम यांना ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने इंदापूर भूषण पुरस्कार तसेच वार्षिक सभा संपन्न
ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर भूषण पुरस्काराचे वितरण सोहळा आणि वार्षिक सर्वसाधारण सभाचे आयोजन
इंदापूर (प्रतिनिधी):इंदापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने इंदापूर शहरातील नामवंत हस्तींना इंदापूर भूषण पुरस्काराने इंदापूर येथील ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात ठीक वा. विविध मान्यवरांचा हस्ते गौरविण्यात आले.
ज्येष्ठ लेखिका श्रीमती प्रतिभा ताई गारटकर, डॉ.लहू कदम व मोहन(बच्चू ) कांबळे आदींना साहित्य, सामाजिक व धार्मिक कार्याबद्दल इंदापूर इंदापूर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सर्व प्रमुख पाहुण्यांनी सरस्वती पूजन केल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली.या ठिकाणी दर महिन्याला विविध मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला जातो. व वृद्धांना मायेचा आधार दिला जातो.पुरस्काराची रूपरेषा व लेखन श्री. सामसे सर यांनी केले.यानंतर श्रीमती. गारटकर ताईंनी ज्येष्ठ नागरिक संघाला रोख रक्कम दहा हजार रुपये सदिच्छा देणगी दिली.यामुळे संघाकडून त्यांचे आभार मानण्यात आले .
या नंतर वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.संस्थेचे सचिव श्री. हनुमंत शिंदे यांनी सभेपुढे विषय मांडले. मांडलेल्या सर्व विषयांना एक मुखाने मंजुरी देण्यात आली.खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली.यानंतर स्नेहा भोजनाचा आनंद सर्वांनी हसत खेळत घेतला.
कार्यक्रमाचे श्री.नंदकुमार गुजर यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव हनुमंत शिंदे यांनी केले.श्री प्रमोद भंडारी यांचा स्वर संगीत गायानचा कार्यक्रम पार पडला.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे विद्यमान अध्यक्ष बाबासाहेब घाडगे, मा.अध्यक्ष नंदकुमार गुजर ,लेखक महादेव चव्हाण सर, बंडू तात्या वाघ ,भारत बोराटे, पांडुरंग जगताप, अशोक गानबोटे,संभाजी व्यवहारे,सुभाष दोशी,तुकाराम मोरे, रघुनाथ खरवडे,जाधव मॅडम व गांधले सर, सुभाष महाजन सर,अंकुश ढुके,सिकंदर इनामदार, विश्वनाथ शिंदे, श्रीमती सुनीता देशपांडे व शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.