पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्षपदी बंटीभाऊ सोनवणे यांची निवड

प्रतिनिधी:(इंदापूर) दिनांक ७जानेवारी २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह, पुणे येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा ) मा. जयदिप कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या प्रयत्नाने ८ जानेवारी २०२५ रोजी बौद्ध धम्म ध्वज दिनाचे औचित्य साधून बी. एस. ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष बंटीभाऊ सोनवणे यांनी जाहीर प्रवेश करून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युवक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )मा.जयदिपभाई कवाडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी निवडीला उत्तर देताना बंटीभाऊ सोनवणे म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष लाँगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे सर, कार्याध्यक्ष जयदिप कवाडे यांचे कार्य, समाज्याप्रतीचा त्याग,तळमळ, विचार, पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून व पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू मी फक्त नियुक्ती पत्र घेऊन शांत न बसता पीपल्स रिपब्लिकन रिपब्लिकन पार्टीची ताकद पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये वाढवून पक्ष मजबूत करणार असल्याचे सांगितले.

   तसेच बंटीभाऊ सोनवणे यांना शुभेच्छा देताना राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे म्हणाले की, बंटीभाऊ सोनवणे यांच्या प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे मत व्यक्त केले. पक्ष संघटना वाढीचे काम करत असताना आपणाला जर कोणतीही अडचण आली तर हा जयदिप कवाडे व संपूर्ण पीपल्स रिपब्लिकन पार्टी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे आश्वासन देत आपल्याला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य शोषित, वंचित, पिढीत, दीन दुबळ्या लोकांचे प्रश्न सोडवून त्यांना आपण न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले, पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश भालेराव, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून निवडीसाठी बंटीभाऊंना शुभेच्छा दिल्या.

 पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, बारामती तालुकाध्यक्ष आनंद लोंढे, सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजीत सरवदे, सोलापूर शहराध्यक्ष शरणू हजारे, माळशिरस तालुकाध्यक्ष विश्वास उगाडे, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब ननवरे, इंदापूर तालुका प्रभारी संतोष गायकवाड, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन जाधव, तालुका संपर्कप्रमुख सावता नवगिरे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, इंदापूर तालुका अध्यक्ष सुनील सोनवणे, मनोजभाई साळवे, मनोजभाई ढोकळे, प्रमोद चव्हाण, आनंद लोंढे, विशाल शिंदे, राहुल सोनवणे, विजय मिसाळ, देवेंद्र सोनवणे, समाधान चव्हाण, वर्धमान पिसे, वैभव आढाव, उमेश मखरे, अमोल लांडगे, दीपक चव्हाण, विजय बंडलकर, आशिष गायकवाड, रोहित मोहिते, गणेश मधने, शुभम मखरे, रजनीकांत लोंढे, योगेश जगताप, विक्रम भोसले,विकी खरे,नितीन घनवट, सुरज सोनवणे, सचिन गायकवाड, मनीष ननवरे, गालिबभाई शेख, निलेश कांबळे, प्रकाश कतारी, पंडित सोलंकी, यांचेसह मोठ्या प्रमाणात भीमसैनिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!