श्री. नारायणदास रामदास हायस्कूलची गायत्री संतोष आटोळे हिने ९७.८०% गुण मिळवून संस्थेत मिळवला प्रथम क्रमांक..!
इंदापूरच्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सात शाळांचा सरासरी निकाल ९५.०३ टक्के
इंदापूर ता.२७: इंदापूर येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तालुक्याच्या विविध भागातील सात शाळांचा दहावीचा सरासरी निकाल ९५.०३ टक्के लागला असून यामध्ये इंदापूर शहरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या कुमारी गायत्री संतोष आटोळे हिने ९७.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कुमारी समृद्धी बापूराव जाधव हिने ९७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर राहुल सर्जेराव कोळेकर व राजवर्धन अविनाश ठोंबरे या दोघांनाही ९५.२०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, संचालक राजवर्धन पाटील सचिव ॲड.मनोहर चौधरी, मुख्याध्यापक संजय सोरटे यांच्यासह सर्व पदाधिकारी,यशस्वी विद्यार्थी व त्यांना शिकवणारे सर्व शिक्षक यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च २०२४ या दहावीच्या परीक्षेत इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर (९४.८४), उत्कर्ष विद्या मंदिर कालठण नंबर एक (९५.१२), प्रगती विद्यामंदिर लोणी देवकर (१००), नंदकेश्वर प्रगती विद्यालय सराफवाडी (९८.३६), महात्मा फुले विद्यालय बिजवडी (९१.८०), श्री नानासाहेब केरबा व्यवहारे विद्यालय शिरसोडी (९४) व श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर (९७.६७%) या सात शाळांचा सरासरी निकाल ९५.०३ टक्के लागला आहे.
दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन व्यक्त होत आहे.
–