सामाजिक कार्यकर्ते ललेंद्र शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
इंदापूर (प्रतिनिधी)
मातंग एकता आंदोलनाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते ललेंद्र शिंदे यांच्या ३६व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या अभिष्टचिंतन सोहळ्याला मातंग एकता आंदोलनाचे प्रमुख नेते अविनाश बागवे यांनी उपस्थित राहून ललेंद्र शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम झाला तर मूकबधिर निवासी शाळा इंदापूर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यानंतर साठेनगर येथे वाढदिवसाचा केक कापण्यात आला. यावेळी भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद , ॲड.गिरीश शहा व प्रा. कृष्णा ताटे आदींची प्रमुख भाषणे झाली. यानंतर अभिष्ट चिंतन सोहळ्यास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. अश्याप्रकारे ललेंद्र शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, शिवाजी पवार, प्रकाश आरडे, संतोष देवकर, संदीप चव्हाण व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.