Wednesday, November 5, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

इंदापूर येथे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम!

इंदापूर (दि. २ नोव्हेंबर) — टायगर ग्रुप भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मा. श्री. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने इंदापूर येथे अभिष्टचिंतन सोहळा आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या निमित्ताने टायगर ग्रुपचे मोहन आबा नगरे आणि भावी नगरसेवक विवेक भाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम चौक येथील श्रीराम मंदिरात अनाथ लहान मुलांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे इंदापूर शासकीय रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळे, पाण्याच्या बाटल्या आणि खाऊ देण्यात आला.

या उपक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदविला. त्यामध्ये पैलवान युवा नेते अशोक भाऊ चोरमले, दलित महासंघटना अध्यक्ष बाळासाहेब पाटोळे, युवा नेते अमजद  शेख, कुंभारगाव सरपंच राहुल शेठ भोई, दत्ता नगरे, विजय केवटे, युवा नेते बिबीशन चोरमले, लहुजी शक्ती सेना अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, गणेश खबाले, रमेश भाऊ डावरे तसेच टायगर ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सामाजिक कार्यातून डॉ. तानाजी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याने समाजसेवेचा सुंदर संदेश दिला असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!