टेंभुर्णी नाक्यावरील २० लाख ५६ हजार रुपयांचे डाळिंबाच्या प्रतिकृतीला कवडी करपा व सुरस्या रोगाची लागण

इंदापूर (प्रतिनिधी):शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

 टेंभूर्णी नाक्यावरील उभरण्यात आलेल्या २१लाख ५६ हजाराच्या डाळिंबाच्या प्रतिकृतीला कवडी करपा व सुरस्याचीलागण झाली आहे. डाळिंबाचे विखुरलेल्या दाण्यांचा रंग उडाला असूनउभारलेली प्रतिकृती निस्तेज व भकास वाटत आहे.डाळिंबाचे दाणे रंगीत दिसण्यासाठी डाळिंबाच्या प्रतिकृतीला लाल रंग देण्यात आला होता.तो लाल रंग उडून गेला असून डाळिंब पिवळ्या व तांबड्या रंगाचे दिसून येत आहे.तसेच रात्रीच्या वेळेस अंधारात दिसण्यासाठी ज्या लायटिंगचा वापर करण्यात आला होता ती पूर्ण पणे बंद आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रतिकृती दिसून येत नाही. दुरून ही प्रतिकृती लोखंडाची दिसते.ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आली आहेत.

लाईन स्थलांतरित ,नादुरुस्त पाणीपुरवठा लाईन दुरुस्त व पुनरटाकणी करणे तसेच चौक सुशोभीकरण करणे आदी कामांसाठी राज्यशासनाकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य यांच्याकडून  सदरची कामे २ कोटी ६७ लाख २१ हजाराची कामे आहेत.मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.आणि कामांना सुरुवात करण्यात आली होती.

यामध्ये इंदापूर अकलूज सांगोला विद्युत लाईनचे स्थलांतर करणे या कामाअंतर्गत सुमारे ८७ लाख ६२ हजाराची कामे करण्यात आली आहे. तर इंदापूर अकलूज सांगोला रस्त्यावर चौक सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे १ कोटी ६८ लाख २७ हजारांची कामे करण्यात आली.इंदापूर अकलूज सांगोला रस्त्यावर चौक सुशोभीकरण करण्यात आले आहे.यामध्ये सुशोभीकरण कामे १कोटी ६८लाख २७ हजाराची कामे करण्यात आली आहे.

इंदापूर अकलूज सांगोला रस्त्यावर टेंभुर्णी नाक्यावर २० लाख ५६ हजार रुपयाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सुशोभीकरणासाठी प्रतिकृती म्हणून २० लाख ५६ हजार रुपयांचे एक डाळिंब बसविण्यात आले आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा डाळिंब कोणत्या ठेकेदार अथवा कोणत्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बसिवण्यात आले आहे याचा उल्लेख नाही.तसेच ते किती रुपयांचे आहे. याचाही उल्लेख नाही. इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत विचारले असता ते सरळ हात वर करतात. १७एप्रिल २०२२ रोजी खा. सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते निरा – नरसिंह विकास आराखड्यातून इंदापूर अकलूज सांगोला रस्ता सुधारणा अंतर्गत १ कोटी रुपयांच्यावर इंदापूर शहरात ठीक ठिकाणी चौक सुशोभीकरण मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते.

अश्या अनेक प्रतिकृती इंदापूर शहरात काही ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत.ज्यांच्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती, परी, सिंह , मालोजी राजे स्मारक, फ्लेमिंगो पक्षी, विविध पिकांची कणसे व मशाल यांच्या प्रतिकृती आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!