राजेवली चौकातील परी! अवस्था नाही काही तिची खरी!
राजेवली चौकातील परीची दुरावस्था! सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त!
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
श्री.क्षेत्र निरा – नरसिंहपूर विकास आराखडा रा.मा. इंदापूर अकलूज सांगोला रस्ता सुधारणा कामाकरीता आवश्यक असणाऱ्या विद्युत लाईन स्थलांतरित ,नादुरुस्त पाणीपुरवठा लाईन दुरुस्त व पुनरटाकणी करणे तसेच चौक सुशोभीकरण करणे आदी कामांसाठी राज्यशासनाकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासन निर्णय क्र. २०१६/३/प्र. क्र २०२/पर्यटन दि.१६ नोव्हेंबर २०१६ अन्वये या कामांना पुणे जिल्हा कार्यालयाकडून मान्यता प्राप्त होऊन दि.१४ नोव्हेंबर २०१९ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंजुरी मिळाली .सदरची कामे २ कोटी ६७ लाख २१ हजाराची कामे आहेत.मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.आणि कामांना सुरुवात करण्यात आली होती.
राजेवली चौकात परीची प्रतिकृती बसविण्यात आली आहे. तसेच प्रतिकृतीला शोभा आणण्यासाठी गोल कट्टा बनविण्यात आला आहे. आणि त्याच्याभोवती नदीतील दगडी गोटे सुशोभीकरणााठी बसविण्यात आले होते. आज मात्र त्या ठिकाणी सगळे दगडी गोटे निघून पडले तर काही नालयाकांकडून पोबारा झाले. त्यामुळे तो कठडा बेसूर दिसून येत आहे.
परीच्या प्रतिकृतीला पांढरे चट्टे पडू लागले आहेत.जणू काही परी कोडाच्या आजाराने ग्रस्त आहे असे वाटते.कारण ज्याप्रमाणे सिंहाच्या पायाला काळा डाग पडलेला आहे त्याचप्रमाणे परीला देखील पायाला पांढरे डाग पडले आहेत. परीच्या प्रतिकृतीची उद्घाटन कोनशिला तुटलेल्या अवस्थेत आहे. आणि ज्या कठड्यावर परी उभी तो कठडा काही ठिकाणी चिरला आहे .सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी पाईप किंवा काहीच नाही.
त्यामुळे प्रतिकृतीला वेगवान गाड्यांपासून धोका राहू शकतो.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग कोणत्या कारणाने दुर्लक्ष करीत आहे हे समजण्यास मार्ग नाही.
इंदापूर शहर ही मालोजी राजेंची नगरी आहे. शहराला फार मोठा इतिहास आहे. परंतु जर अशी कामे होणार असतील तर त्या इतिहासाला तडा घालवण्याचे काम कोण करतेय अशी चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आमदार दत्तात्रेय भरणे आपले सर्व काही पणाला लावून तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीतही कामे आणली. आणि तालुक्याचा विकास केला. आज तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. आणि शेतकरी बांधा वरून आपला माल मार्केट पर्यंत घेऊन जाऊ लागला . आणि म्हणून भरणे हे इंदापूर करांच्या गळ्यातील ताईत आहे. लोक भरणे यांना जीव की प्राण मानतात.
अंदाजे २० लाख रुपयांचे आसपास खर्च करून हे सुशोभीकरण करण्यात आले आहे. परंतु एवढं सगळं करून काय फायदा असा सवाल जनतेतून केला जात आहे. संबधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई मामांनी करावी असेही सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.