भरतशेठ शहा यांच्या शक्ती प्रदर्शनाने भल्या भल्यांची उडाली भंबेरी!

इंदापूर( प्रतिनिधी): राजकारणातला संयम भविष्याची ताकद व नांदी दर्शिवतो, असाच काही प्रत्यय लोकप्रिय नेते व कर्मयोगी सहकारी कारखान्याचे व्हा. चेअरमन भरतशेठ शहा यांच्या मित्र परिवाराने आयोजित केलेल्या कालच्या दहीहंडीच्या माध्यमातून शहा ब्रदर्स यांची राजकीय ताकद दिसून आली.

इंदापूर शहरात जुने मार्केट कमिटीच्या भव्य मैदानात भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीने शहराबरोबरच इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेचे व राजकारण्याचे लक्ष वेधून घेतले.

त्यामुळे विरोधक आणि अनेक नेत्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरली.

मंचावरील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीने इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शिवली.

विशेषतः महिला वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. नारी शक्तीने शहा परिवाराला दहा हत्तीचे बल प्राप्त करून दिले.

याबाबतची नोंद सिने अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनी घेतली. उपस्थित जनसमुदायने परिसरात नवं चैतन्य निर्माण झाले होते.

भरतशेठ शहा चषकाचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते.या दही हंडी उपक्रमास पुणे जिल्हा सह.बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय सचिव ॲड.राहुल मखरे युवा नेते प्रदीप जगदाळे,इंदापूर पंचायत समितीचे मा.सभापती करणसिंह घोलप,युवा नेते प्रशांत उंबरे, बी.एस. ग्रुपचे अध्यक्ष बंटीभाऊ सोनवणे, आर.पी.आयचे तालुकाध्यक्ष संदीप कडवळे, मा.नगरसेवक विनायक बाब्रस , नगरसेवक गजानन गवळी, नगरसेवक पोपट शिंदे, मा.नगराध्यक्ष, आर. पी.आय नेते शिवाजी मखरे,  गणेश महाजन तालुक्यातील अनेक दिग्गज युवा नेते नेताजी मित्र मंडळाचे अध्यक्ष शुभम पवार  आर.एन बॉईज ग्रूपचे अध्यक्ष मयूर ढावरे आदी उपस्थित होते.भरतशेठ शहा व मुकुंदशेठ शहा यांच्या कालच्या राजकीय शक्तीने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने तालुक्याचा २०२४चा आमदार कोण ? हे ते ठरवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

रशियन महिला कलाकारांनी सादर केलेली विद्युत रोषणाई व अग्नी कला हे या दही हांडीचे प्रमुख आकर्षण होते.

उभारलेला भव्य शामियाना , आकर्षक विद्युत रोषणाई, ठीक ठिकाणी एल.डी स्क्रीन,महिला वर्गासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, सिने कलाकारांसाठी उभारलेला आकर्षक मंच, ४०फुटी उंचावरील असलेली दहीहंडी, आणि सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आकाश कांबळे यांचे बाउन्सर आणि डिजेच्या तालावर थिरकलेली तरुणाई व प्रचंड जमलेला समुदाय हे या दही हंडीचे वैशिष्ट्य होते.

इंदापूर तालुक्यातून विविध राजकीय पक्षातील व संघटनेमधील पदाधिकाऱ्यांनी शहा परिवाराला साथ सहयोग दर्शवण्यासाठी शहरात ठीक ठिकाणी बॅनर लावल्याने शहा परिवाराच्या राजकीय शक्तीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक , सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक विकासात शहा परिवाराचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ असो अथवा साखर कारखाने , बँका , छोट्या छोट्या सहकारी संस्था यांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम या परिवाराने केले आहे. मदतीची अपेक्षा घेऊन आलेला कधीच दुःखी होऊन गेला नाही , आणि गेला तर तो हसतच जाणार हे परिवाराचे वैशिष्ट्य होय. भरतशेठ शहा यांना तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व मानले जाते.सौ.अंकिता शहा या इंदापूर नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा असून जनतेतून निवडून आलेल्या प्रथम महिला नगराध्यक्षा आहेत.

त्यांच्या पाच वर्षाच्या कालखंडात इंदापूरचा चेहरा मोहरा बदलून टाकला. आणि कर्जाच्या ओझ्याखाली असलेली नगरपालिका कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. शहरातील आरोग्य, वीज , पाणी , रस्ते, सांड-पाणी व्यवस्था , कर्मचाऱ्यांचे नियमित केलेले पगार , शहरात राबवलेली स्वच्छता अभियान आणि दिल्लीत इंदापूरकरांची उंचावलेला मान आणि कोरोनाच्या काळात नागरिकांना केलेली अमुलाग्र मदत व इंदापूरकरांचा या परिवारावर असलेला दृढ विश्वास हे सर्व चित्र कालच्या गर्दीवरून जाणवत होते.

भरतशेठ शहा चषक दहीहंडीचे मानकरी महात्मा जोतिबा फुले इंदापूर  हे ठरले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भरतशेठ शहा मित्र परिवाराने अतिशय सुंदर पण आव्हानात्मक नियोजन केले.याची चर्चा तालुकाभर चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!