उद्या त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व भव्य मिरवणुकीचे आयोजन .
इंदापूर(प्रतिनिधी): डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी २०२४ -२०२५ तर्फे उद्या त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष बंटीभाऊ सोनवणे यांनी पा.चक्रव्यूह बोलताना दिली.
सालाबाद प्रमाणे यंदाही आपण माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन केलेले असून संपूर्ण जगाला त्यांच्या त्यागाचे महत्व समजावे आणि अखंड भारताच्या भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी बाबासाहेबांना पावलो पाऊली मदत केली. म्हणूनच त्यांच्या त्यागाची व कार्याची महती सर्व समाजाला सांगण्यासाठी आपण त्यांच्या जयंतीचे आयोजन दरवर्षी करत असतो असेही ते म्हणाले तसेच इंदापूर तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या बंधू भगिनींनी व सर्व आंबेडकरवादी संघटना पक्ष आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांना अभिवादन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन जेतवन बुद्धविहार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सकाळी दहा वाजता केले आहे.
सकाळी भव्य पुतळ्याचे अनावरण आणि पूजन उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यासाठी शासकीय व प्रशासकीय पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच सायं ठीक ६ वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.