वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुक्याच्या वतीने उद्याच्या १७ तारखेच्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा – कीर्तिकुमार वाघमारे

इंदापूर (प्रतिनिधी ):बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास वंचित बहुजन युवा आघाडी इंदापूर तालुक्याच्या वतीने उद्या होणाऱ्या १७ तारखेला मूक मोर्चा आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात येणार आहे तसेच इंदापूर तालुक्यातील सर्व युवा पदाधिकारी व शाखा प्रमुखांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष कीर्तिकुमार वाघमारे यांनी केले.

यावेळी ते म्हणाले की उद्याचे होणारे आंदोलन हे आपल्या अस्मितेची लढाई असणारे आंदोलन आहे.

त्यामुळे आपल्यातील सर्व मतभेद विसरून एकत्र यावे असेही त्यांनी आवाहन या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने केले.

यावेळी इंदापूर तालुक्यातील सर्व युवा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!