वंचित बहुजन युवा आघाडीत इंदापूर शहरातून युवकांचा जाहीर प्रवेश
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूर शहरातून मोठ्या संख्येनं युवा वर्गाने वंचित बहुजन आघाडीत जिल्हाध्यक्ष मंगलदास भाऊ निकाळजे व इंदापूर तालुकाध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला.
यावेळी निकाळजे म्हणाले की, वंचित बहुजन युवा आघाडी हे संघटन राज्य पातळीवर अतिशय वेगाने वाटचाल करणारे संघटन असून गोर गरीब , वंचितांसाठी धावून जाणारे आहे. त्यामुळे जेथे अन्याय होईल तिथे आम्ही अन्यायाचा बीमोड करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आणि म्हणूनच आज आमचे युवा संघटन वेगाने वाढत चालले आहे.त्यामुळे भविष्यात आम्ही बहुजन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे सूतोवाच यानिमित्ताने त्यांनी दिले.
यानंतर त्यांच्या उपस्थित अखिल मोमीन, रवी रणखांबे,किरण सलगर,हुसेन मुलाणी,शकील सय्यद,विकास जाधव, किरण जावळे आणि आणि निशाद मोमीन आदी युवा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
यानंतर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे यांनी दि.३१ डिसेंबर२०२४ रोजी युवा नेते सुजात आंबेडकर यांचे आगमन होणार असून त्यांच्या उपस्थित मोठी बाईक रॅली इंदापूर शहरातून काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात चर्चा झाली.यावेळी इंदापूर तालुका युवा आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश जाधवआणि उमेश मोरे ,महासचिव शैलेश सोनवणे, प्रसिध्दी प्रमुख धीरज कांबळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक किर्तीकुमार वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश मोरे यांनी केले.