विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लाखेवाडी दहावीचा निकाल शंभर टक्के
वडापुरी प्रतिनिधी
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लाखेवाडीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ दहावीचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के लागला. यामध्ये शिंदे प्रणाली अजित(९४.२०)प्रथम क्रमांक, खाडे अंकिता अनिल(९३.६०)द्वितीय क्रमांक, पडसळकर सानिका ज्ञानदेव (९२.२०) तृतीय क्रमांक. परीक्षेला एकूण ६२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी विशेष प्राविण्यासह ३३विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये २७ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये २ विद्यार्थी आले आहेत. तरी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्रीमंत ढोले सर, उपाध्यक्षा मा.चित्रलेखा ढोले मॅडम, मुख्य सल्लागार मा.प्रदीपजी गुरव साहेब, सचिव मा.हर्षवर्धन खाडे, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य सम्राट खेडकर सर, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र सरगर सर, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पवार सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.