वालचंदनगर–बोरी जिल्हा परिषद गटात गटात सुलोचना गायकवाड इच्छुक!
इंदापूर :भरणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर कार्य करताना विकासकामांमुळे ओळख निर्माण झालेल्या सुलोचना गायकवाड या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वालचंदनगर–बोरी गटातून इच्छुक म्हणून सक्रिय झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर त्या जनसंपर्क आणि संघटनात्मक तयारी करत असल्याचे समजते.
ग्रामपंचायत सरपंच म्हणून सुलोचना गायकवाड यांनी रस्ते, पाणीपुरवठा, गटार बांधकाम, घरकुल यांसारखी मूलभूत विकासकामे हाती घेतली. कोरोना काळात स्थानिक नागरिकांच्या सेवेसाठी त्यांनी आरोग्यविषयक आणि जनजागृती उपक्रमही राबवले.
महिलांच्या सबलीकरणावर भर देत स्वयं-सहायता गट, कौशल्य विकास आणि शैक्षणिक प्रबोधन या क्षेत्रात त्यांनी उपक्रम सुरू ठेवले आहेत. ग्रामीण भागातील महिला आणि तरुणाईला विकास प्रक्रियेत सहभागी करण्याचा त्यांचा प्रयत्न कायम आहे.
वालचंदनगर–बोरी गटातील विविध गावांमध्ये सध्या त्या नागरिकांशी संवाद साधत असून पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली सुलोचना गायकवाड या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत इच्छुक म्हणून आपली भूमिका निश्चित करण्याच्या तयारीत आहेत.
