सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी इंदापूर बंदचे आवाहन 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी इंदापूर बंदचे आवाहन

इंदापूर( प्रतिनिधी):भारतीय संविधानाने दिलेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण व क्रिमीलेअर लागु करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दि.१ ऑगस्टच्या निकालाच्या विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनुसूचित जाती जमातींच्या विविध संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या ( दि.२१) देशपातळीवरील बंदला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व इतर संघटनांनी पाठींबा देवून इंदापूर बंद ची हाक दिली आहे. यासंदर्भातील निवेदन सोमवारी (दि.१९) तहसीलदार जीवन बनसोडे व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना देण्यात आले.

याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती इंदापूर शहर,सर्व सामाजिक राजकीय आंबेडकरी संघटना व अनुसूचित जाती, जमाती समाज बांधव यांनी प्रसिध्दीसाठी पत्रक दिले आहे.भारतीय संविधानाने दिलेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण व क्रिमीलेअर लागु करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया पत्रकात व्यक्त केली आहे. या निर्णयाने याच सर्वोच्च न्यायालयाचा यापुर्वी २००४ साली दिलेला ५ सदस्यीय खंडपीठाचा निर्णय रद्द बातल ठरवला आहे. ५६५ पानांच्या या निर्णयामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसंदर्भात मुद्दे मांडताना घटनाबाहय एडब्ल्यूएस आरक्षणाचा उल्लेख ही करण्यात आलेला नाही. न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना क्रिमीलेअर लावण्याचा निर्णय देवून आरक्षण फक्त एका पिढीपर्यंत असण्याची बाब कोणता ही संविधानिक आधार नसताना टाकलेली आहे, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी रिपाइं चे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे,रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस संदिपान कडवळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बंटी सोनवणे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, वंचित चे शहराध्यक्ष सुभाष खरे, राष्ट्रसेवा दलाचे शहराध्यक्ष हनुमंत कांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे प्रा. बाळासाहेब मखरे, इंडियन लॉयर्स असोसिएशनचे ॲड. सुरज मखरे,ॲड. किरण लोंढे,कीर्तीकुमार वाघमारे, उमेश मखरे, पवन मखरे, आशिष चव्हाण, रजनीकांत लोंढे, अक्षय मखरे, सागर जाधव, रोहित मखरे, सुनील पोळ, शंकर मखरे, संतोष मखरे, रोहित मखरे, दर्याराज मखरे, दर्याराज पं. मखरे, सागर शिंदे, सुमित मखरे, रोहित मोहिते, जनार्दन खरे, अजय मखरे,रमेश लोंढे, शुभम कां. मखरे, परमेश्वर मखरे, मुकेश मखरे, अमित मखरे, अजय पारसे, सागर जाधव, वंचला मखरे, सुलभा सोनवणे, छाया मखरे, भारती भोसले, अर्चना मखरे, वैशाली मखरे, लतिका मखरे, साईत्रा मखरे यांच्यासह एससी,एसटी प्रवर्गातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!