अजित घुले यांच्या प्रयत्नातून महारक्तदान शिबिर उत्साहात मांजरी बु.||येथे संपन्न.
अजित दत्तात्रय घुले यांच्या प्रयत्नातून महारक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.
-स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त मांजरीत करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे आयोजन.
बुधवार, १४ ऑगस्ट २०२२, पुणे
भारताच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आधल्या दिवशी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी खासदार अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश सरचिटणीस अजित दत्तात्रय घुले यांच्या माध्यमातून जगदंब प्रतिष्ठानतर्फे मांजरी येथील संपर्क कार्यालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक रक्तदात्यांनी शिबीरात सहभाग घेत या सामाजिक कामाची शोभा वाढवली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी व त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांच्या संकल्पनेने रविवारी अजित दत्तात्रय घुले यांच्या मांजरी येथील संपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला.यावेळी हडपसर विधानसभेचे आमदार चेतनदादा तुपे पाटील, सुरेश अण्णा घुले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अजित घुले यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून युवकांसह महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी होत रक्तदान केले. यावेळी तब्बल ९९ इतक्या बाटल्यांचे रक्तसंकलन झाले. यावेळी रक्दान करणा-या व्यक्तींच्या दातृत्वाची जाण ठेवत अजित घुले यांच्यातर्फे प्रत्येक रक्तदात्यास ६ लाखांचा सुरक्षा कवच देण्यात आला. ज्यामध्ये ३ लाखांचा अपघाती विमा आणि ३ लाखांच्या अतिरिक्त वैद्यकीय विमेचा समावेश आहे.
प्रतिक्रिया,
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत सामाजिक उपक्रम हाती घ्यावा, ज्या माध्यमातून अत्यावश्यक गरज पूर्ण होईल या हेतूनेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मांजरी भागातील नागरिकांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होत या सामाजिक उपक्रमात उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. रक्तदान शिबिरात सहभागी होत सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचललेल्या सर्वांचा मी आभारी आहे.
– अजित दत्तात्रय घुले- प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश.