इंदापूर बस स्थानकात बेशिस्त पार्किंगमुळे एस टी बसला वाहतुकीस अडथळा.

इंदापूर बसस्थानकात दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे एस टी बसला वाहतुकीस अडथळा

इंदापूर/प्रतिनिधी: इंदापूर बसस्थानकात दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावर उभी केली जातात. अस्ताव्यस्त वाहनांमुळे येणाऱ्या एस टी बसला थांब्यासाठी अडचण होते.

याआधी बस स्थानकाकडून सुरक्षारक्षक नेमण्यात आला होता. पण तो काही काळापुरताच असल्याने अलबेल होते.बेशिस्त वाहने कशीही लावली जातात, काहींची वाहने तर अगदी जेथे एस टी थांबते तिथंच दुचाकी पार्किंग केली जातात.

त्यामुळे तेथे कुठलीच सुरक्षा व्यवस्था व शिस्त नसल्याने पोलीस यंत्रणा नसल्याने  मनमानी कारभार चालतो.बाहेरून येणाऱ्या एस टी बसेसला फार अडथळ्यांचा सामना करावा लागतो. बेशिस्त पार्किंगमुळे प्रवासी बस स्थानकाच्या बाहेरच उतरतात. यामुळे विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!