ताज्या घडामोडी

इंदापूर येथे भव्य हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन! भरतशेठ शहा यांच्या विशेष संयोजन व मार्गदर्शनाखाली सप्ताह पार पडणार!

इंदापूर येथे भव्य हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा

भरतशेठ शहा यांच्या विशेष संयोजन व मार्गदर्शनाखाली सप्ताह पार पडणार!

इंदापूर (ता. इंदापूर) येथे श्रीगुरु नामदेव आण्णा माळी (वसेकर) पुण्यतिथी उत्सव समिती यांच्या वतीने रविवार, दि. ७ सप्टेंबर ते शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत भव्य हरिनाम सप्ताह व माऊली गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावर्षी श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फड, पंढरपूर-आळंदी यास २२५ वर्षे पूर्ण होत असून, श्रीगुरु नामदेव आण्णा माळी वसेकर यांची ११४ वी पुण्यतिथी, तसेच माऊली ज्ञानोबाराय जन्मोत्सव वर्ष ७५० व नामदेवराय समाधी संजीवन वर्ष ६७५ यानिमित्त हा सोहळा विशेष ठरणार आहे.

दररोजची सेवा वेळापत्रक:

रविवार, ७/९/२०२५ – विरहनी कीर्तन सेवा: मुंबई / कोकण विभाग, प्रवचन सेवा: कर्नाटक विभाग, कीर्तन: ह.भ.प. सागर महाराज बोराटे (नातेपूते)

सोमवार, ८/९/२०२५ – विरहनी कीर्तन सेवा: इंदापूर, प्रवचन सेवा: मुंबई / कोकण, कीर्तन: ह.भ.प. देवेंद्र महाराज निडालकर (गाथामृती)

मंगळवार, ९/९/२०२५ – विरहनी कीर्तन सेवा: लातूर, प्रवचन सेवा: कोल्हापूर / सांगली, कीर्तन: श्रीगुरु जयवंत महाराज बोधले (पंढरपूर)

बुधवार, १०/९/२०२५ – विरहनी कीर्तन सेवा: कर्नाटक, प्रवचन सेवा: लातूर / इंदापूर, कीर्तन: श्रीगुरु चिन्मय महाराज सातारकर (मुंबई)

गुरुवार, ११/९/२०२५ – विरहनी कीर्तन सेवा: सांगली, प्रवचन सेवा: पुणे / सोलापूर, कीर्तन: श्रीगुरु अमृत महाराज जोशी (पीड)

शुक्रवार, १२/९/२०२५ – नगर प्रदक्षिणा दिंडी, प्रवचन सेवा: नावगड / वेंगुर्ला, कीर्तन: श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे (काका माऊली) आजरेकर

शनिवार, १३/९/२०२५ – सांगता सोहळा व विशेष कीर्तन

सप्ताहात दररोज मान्यवर संतांचे कीर्तन, प्रवचन व गाथा पारायण होणार असून, सांगता शनिवार, दि. १३ सप्टेंबर रोजी होईल.

या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी भरत शहा यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!