उजनी ७७.३८ टक्के पार! विसर्ग होत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज.
इंदापूर प्रतिनिधी : शिवाजी शिंदे : सोलापूर जिल्ह्यातील सर्वांच्या नजरा लागलेल्या उजनी धरणाने आज ७७. ३८ टक्के पार केले आहे. तरीही उजनीतून सध्या विसर्ग होत नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
सध्या उजनीत केवळ दौंड येथून ८ हजार ४३९ क्यूसेकचा विसर्ग येत आहे. त्यामुळे संथ गतीने का होईना उजनी धरण १०० टक्क्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने धरलेला जोर कमी झाला आहे. उजनीतून बोगद्यात पाणी सोडले आहे; मात्र कालव्यात पाणी न सोडल्याने शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. उजनीवर जिल्ह्याचे अर्थकारण व राजकारण अवलंबून असल्याने उजनी चर्चेचा विषय आहे. उजनी जलाशयाच्या पाणी पातळीत वरचेवर वाढ होत असल्याने उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने करण्याकडे करण्याकडे वाटचाल सुरू केले असून, येत्या आठ-दहा दिवसांत १०० टक्के होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या ८० टक्क्यांच्या जवळपास असतानाही उजनीतून पाणी सोडण्यात येत नाही. सध्या जलाशयात ७७.३८ टक्के पाणीसाठा झाला आहे.
सध्या ३० जुलै २२ ला उजनी जलाशय ७७.३८ टक्केच्या पुढे भरत असल्याने उजनी लाभक्षेत्रातील शेतकर्यांची आगामी वर्षातील चिंता मात्र मिटत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी आनंदित झाला आहे.