उद्या २२एप्रिल रोजी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात सर्व रोग मोफत आरोग तपासणी व आयुष्यमान भारत कार्ड मिळणार!
•डिजिटल हेल्थ आय. डी (युनिक हेल्थ आय.डी) तसेच आयुष्यमान भारत कार्ड यांचे वाटप करण्यात येणार आहे.यासाठी आधारकार्ड, रेशन कार्ड(पांढरे रेशन कार्ड सोडून), आयडेंटिटी साइज दोन फोटो ,मतदान ओळखपत्र,तसेच येताना मूळ कागद पत्रे व प्रत्येकी कागद पत्रांचे दोन झेरॉक्स प्रती सोबत घेऊन येण्यास सांगितले आहे.
•या आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांना सर्व सुविधा मोफत दिल्या जातील
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.२१ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निम्मित उद्या दि.२२ एप्रिल रोजी सर्वरोग मोफत तपासणी आरोग्य मेळावा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.उद्या दि.२२एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
प्रमुख उपस्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे, राज्यमंत्री श्री.दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री.प्रदीप गारटकर व पुणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधव कणकवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे.
विशेष डॉक्टरांमार्फत सर्वरोग मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.या कार्यक्रमाचे विनीत म्हणून बारामती प्रांतअधिकारी श्री दादासाहेब कांबळे , इंदापूर तहसिलदार श्री. श्रीकांत पाटील,इंदापूर नगरपरिषद मुख्याधिकारी श्री.रामराजे कापरे व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष खामकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे.टी.सरतापे हे आहेत. तालुका व शहरातील सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व प्रशासकीय कार्यालयाकडून करण्यात आले आहे.