कांशीराम साहेब यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभेच्या वतीने विविध कार्यक्रम
इंदापूर प्रतिनिधी : बहुजन समाज पार्टी इंदापूर विधानसभेच्या वतीने बहुजन नायक मान्यवर काशीरामजी साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आणि आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन आज दिनांक ११/०९/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता वालचंदनगर या ठिकाणी केले होते या बैठकीस मार्गदर्शक म्हणून बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माननीय अजितजी ठोकळे साहेब पुणे जिल्हाध्यक्ष रमेशआप्पा गायकवाड साहेब जिल्हा कोषाध्यक्ष श्रीपती दादा चव्हाण हे उपस्थित होते.
बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनंतर या देशांमध्ये बहुजन समाजाच्या आंदोलनाची एक दिशा ठरवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय सत्ता ही मास्टर चावी असून ती हस्तगत केल्याशिवाय दलित बहुजन मागासवर्गीयांचे समस्या सुटणार नाही या बाबासाहेबांच्या आदेशाला प्रमाण मानून बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून देशभरामध्ये बहुजन समाज जागृत केला आणि बहुजन समाज पार्टीला देशातली तिसऱ्या नंबरची पार्टी बनवली. ऋषीमुनींच्या धरतीवरती उत्तर प्रदेशांमध्ये निळा झेंडा आणि हत्ती निशाणीचे चार चार वेळा सरकार बनवून दलित मागासवर्गीय बहुजन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या महामानवाचा स्मृतिदिन ९ ऑक्टोबरला असून त्या स्मृतिदिन साजरा करण्यासाठी बहुजन समाज पार्टी द्वारे कार्यक्रमाचे नियोजन केले गेले. त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले .
यावेळी बहुजन समाज पार्टीचे लोकसभा प्रभारी प्रदीप साबळे विधानसभा अध्यक्ष संतोषजी सवाने ,उपाध्यक्ष मनेश कांबळे, कोषाध्यक्ष आनंद फडतरे, बाबासाहेब सावंत, डॉक्टर प्रफुल्ल लोंढे ,संकेत वाघमारे ,बाळासाहेब सवाने, महिला कार्यकर्त्या ज्योती मोकळे सर्व विधानसभेचे पदाधिकारी कार्यकर्ता हितचिंतक सदर बैठकीस उपस्थित होते.