खासदार सौ.सुप्रिया सुळे व मा.मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणी ७२कोटी ३३ लाखांच्या विकास कामांचे उद्या भूमिपूजन व उद्घाटन
इंदापूर प्रतिनिधी ( शिवाजी शिंदे)
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील ७२कोटी ३३ लाखाच्या कामाचे उद्घाटन बारामती लोकसभा खासदार सौ.सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते व मा.राज्यमंत्री तथा आमदार श्री. दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.२१ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे. तर या कार्यक्रमाप्रसंगी उद्धट येथे दु.१.३०वा.पहिली सभा व अजोती गावात सायं.ठीक ५.३० वा.आयोजित करण्यात आला आहे.
इंदापूर तालुक्यातील विकासाची गंगा अत्यंत वेगाने वाहत असून ही तालुक्यासाठी आनंदाची बातमी आहे.कारण एकीकडे सरकार बदलले असताना देखील तालुक्याचे भाग्यविधाते व विकासाचा महामेरू म्हणून इंदापूर तालुक्यातील जनता त्यांना ओळखते ते मा. मंत्री दत्तात्रेय भरणे उसंत घ्यायला काही केल्या तयार नाहीत.जणू काही विकास कामाने पछाडलेलेच आहे. म्हणून ते आपल्या भाषणात नेहमी म्हणतात” विकास माझ्या रक्तात आहे.”
विविध योजनांमार्फत इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणी विविध विकास कामाचे पूजन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ.सुप्रिया सुळे व मा.राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार उद्या शुक्रवार दि.२१ ऑक्टोबरला होणार आहेत.
१.छ्त्रपती सहकारी साखर कारखाना ते उदमाईवाडी- घोलपवाडी ते उद्धट – पावरवाडी रस्ता ११ कोटी ४०लक्ष इतक्या रुपयाचा आहे तर डिपीडीसी मधील कामे ६३ लाखाची आहेत.त्यामुळे जवळ – जवळ या परिसरात १२ कोटी रुपयांची कामे होणार आहेत.
२. बंबाडवाडी-चव्हाणवाडी-परिटवाडी ते फडतरे नाॅलेज सिटी कळंब रस्ता करणे – ७ काेटी ६० लाख.
३. शेळगांव स्टॅण्ड-शिरसटवाडी ते निमसाखर रस्ता करणे – १२ काेटी ३५ लाख.
४. शिरसटवाडी जलजिवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा याेजना – १ काेटी ४७ लाख.
५.माळवाडी-ठाकरवाडी-पेटकरवस्ती-चिंदादेवी-अजाेती-सुगाव-पडस्थळ रस्ता करणे – १८ काेटी ०१ लाख.
६. अजाेती-सुगांव जलजिवन मिशन व इतर विविध विकासकामे – ३काेटी ५४ लाख
७. सणसर-३९ फाटा ते काझड रस्ता – १५ काेटी
८. जाचकवस्ती जलजिवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा याेजना- १ काेटी ३३ लाख. आदी कामांचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे.
मा. प्रदिपदादा गारटकर (अध्यक्ष रा.काँ.पार्टी.जि.),मा.अमरसिंह घाेलप मा.चेअरमन,छ.सह.सा.का.),मा.प्रतापरावपाटील(जि.प.मा.सदस्य,जि.प.पुणे),
मा. प्रविणभैय्या माने(मा.सभापती,आ.व.बांध.वि.जि.प.पु.),मा. प्रशांत पाटील (मा.सभापती, पं.स. इंदापूर ),मा. दत्तात्रय फडतरे (मा.सभापती, मार्केट क. इं.),मा. हनुमंत काेकाटे( अध्यक्ष, रा.काँ.पा.इं.ता.),मा.अमाेलपाटील(व्हा.चेअरमन,छ.सह.सा.का.मा.हनुमंत बंडगर(मा.सदस्य,जि.प.पुणे).मा.अभिजीत तांबिले (मा.सदस्य,जि.प.पुणे)मा.श्रीमंतढाेले(मा.सदस्य,जि.प.पुणे),.मा. सचिन सपकळ (सदस्य, जि.नि. समिती), मा. बापूराव शेंडे( मा.सभापती, पं.स. इंदापूर) मा. अतुल झगडे (कार्याध्यक्ष, रा.काँ.पा.इं.ता.)मा.दशरथ डाेंगरे (जिल्हा उपाध्यक्ष, रा.काँ.पा.) मा. दिपक जाधव( युवा नेते, रा.काँ.पा.) मा. शुभम निंबाळकर (अध्यक्ष,रा.यु.काँग्रेस) मा. छायाताई पडसळकर (अध्यक्षा,रा.म.काँग्रेस) आदी उपस्थित राहणार आहेत.
दु.१.० ०वा.जाचकवस्ती येथे कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर उद्धट येथे जाहीर सभा १.३०वा. व माझा मतदार संघ व माझा अभिमान उपक्रम दु.२.४५वा होणार आहे. त्यांनतर कळंब, शिरसटवाडी, सुगाव या गावांमध्ये भूमीपूजन कार्यक्रम होणार असून अजोती या गावी दुसरी सभा सायं.५.३० वा.आयोजित केली असून कार्यक्रमाचा समारोप केला जाणार आहे.