डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे न्याय, स्वतंत्रता,समता आणि बंधुता सर्व भारतीयांनी जपणे गरजेचे – राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे
बावडा प्रतिनिधी चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.२९ : बावडा गावामध्ये आज भारतरत्न,महामानव,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. दत्तात्रय भरणे सहभागी झाले होते.
यावेळी डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.आणि सर्व बौद्ध व भारतीय बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री.भरणे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे न्याय, स्वतंत्रता, समता, आणि बंधुता या मूल्यांची जोपासना करणे प्रत्येक भारतीयांचे मुख्य कर्तव्य आहे. आणि त्याची जोपासना करणे हे गरजेचे आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जातीय भेदाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बावडा येथील जयंती उत्सव सोहळा अतिशय मोठा व देखण्या स्वरूपाचा तसेच मिरवणूक ही भव्य व स्फूर्तिदायक होती.
यानिमित्ताने मा.ना.श्री.दत्तात्रय भरणे यांनी मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.तसेच सर्व बांधवांसमवेत उत्साहात सहभागी झाले. येथेही सोलापूर प्रमाणेच त्यांनी नृत्याचा आनंद घेतला.