देशाचे खरे मूळमालक हे आदिवासी: राहुल गांधी
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
वाशीम दि.१६: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून सामन्यातील सामान्य माणूस त्याच्या अभियानात सहभागी होत आहे.
याचाच एक भाग म्हणून त्यांची ही.मोहीम महाराष्ट्रात येऊन धडकली आहे. आज वाशिम येथील बोरला हिस्से फाटा जिल्ह्यातून अनेक रथी महारथी येथे आले होते. त्यांच्या या रॅलीत मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले की देशाचे खरे मूळ मालक हे आदिवासी आहेत.
यावेळी बिरसा मुंडा की जय अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रज्ञा सातव, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, आमदार अमित झनक, आदी मान्यवर उपस्थित होते.