बसपाच्या वतीने पुणे विधानभवनावर ३ जून रोजी विशाल आक्रोश जनमोर्चा! आम्ही भारतीय आहोत की नाही ?असा बसपा कडून सरकारला सवाल.
पुणे प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि. १ जून : दि ३ जुन २०२२ रोजी पुणे येथे विधान भवनावर भव्य असा विशाल आक्रोश मोर्चा बहुजन समाज पार्टीकडून आयोजित करण्यात आला आहे.शुक्रवार दिनांक ३जून २०२२ वेळ सकाळी १०.००वाजता स्थळ डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,पुणे स्टेशन ते विधान भवन पुणे असा मोर्चाचा मार्ग राहणार आहे.
महागाई,गोरगरीब झोपडपट्टी धारकांच्या , बेरोजगारांना न्याय देण्यासाठी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व ॲड.संदीप ताजने अध्यक्ष बसपा महा.राज्य, प्रभारी महाराष्ट्र प्रदेश डॉ. हुगलेश चलवादी व बहुजन समाज पक्षाच्या राज्य कऱ्यकरणीच्या वतीने या विशाल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
झोपडपट्टी धारकांना ५००स्क्वेअर.फूट घर मिळावे.
दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनांवर त्वरित कारवाई करण्यात यावी.
धन दांडंग्यापासून वतनाच्या जमिनी परत ताब्यात घेऊन त्या मूळ मालकांना परत कराव्यात व तसा शासन कायदा करावा , झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प व्हावा तोपर्यंत अतिक्रमण करू नये. आदी मागण्या बाबत मोर्चा काढण्यात येणार आहे.
डॉ.अशोक सिध्दार्थ खासदार, प्रमोद रैना महा.प्रभारी, नितीन सिंह जाटवआदी महा.प्रभारी आदी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.