राज्याच्या नव्या मंत्रीमंडळात इंदापूर तालुक्याला पुन्हा लाल दिवा ! दत्तात्रेय भरणे यांच्या नावाची राष्ट्रवादीकडून चर्चा

इंदापूर(प्रतिनिधी):राज्यात महायुतीतील मित्र पक्षाची सत्ता स्थापनेसाठी धावपळ सुरू असून उद्याच्या ५ तारखेला मुंबईतमुख्यमंत्री पदासह अन्य महत्वाच्या कॅबिनेट पदांचा देखील शपथ विधी होणार असून इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची माहिती मिळते आहे.

यामुळे इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून दत्तात्रेय भरणे यांना कॅबिनेट मंत्री मिळेल असा आशावाद केला आहे.

दत्तात्रेय भरणे यांनी कर्मयोगी कारखान्याचे विद्यमान चेअरमन हर्षवर्धन पाटील यांचा तब्बल१९ हजार मतांनी पराभव करून आपल्या विजयाची हॅट्रिक केली. तर पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव केला.

संपूर्ण महाराष्ट्रासह अखंड भारताचे या विधानसभेकडे लक्ष लागून होते. हर्षवर्धन पाटील हे नामवंत व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक महत्वाची मंत्रिमंडळाची खाती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!