राजवर्धन दादा चषक २०२२चा एच.के.संघ ठरला मानकरी!
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.२७: १९ मे २०२२ पासून इंदापूर शहरामध्ये १०० फुटी रोड , नवीन तहसील कार्यालया शेजारी चालु आसलेल्या राजवर्धन दादा चषक २०२२ या भव्य टेनिस बॉल क्रिकेटच्या भव्य दिव्य अशा स्पर्धेचा २३ मे २०२२ रोजी बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
कर्मयोगी शंकरराव पाटील सह.सा. कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री. भरत शहा व इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. तय्यब मुजावर भाजपा शहराध्यक्ष श्री.शकील सय्यद या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तसेच सर्व विजयी संघांना मान्यवरांचा हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी श्री.भरत शहा म्हणाले की, इंदापूर तालुका विविध खेळांसाठी व. खेळाडूसाठी प्रसिद्ध आहे. या मातीतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. यावेळी श्री. शहा यांनी आयोजकांचे कौतुक केले.पुढे ते म्हणाले की, भविष्यात इंदापूर तालुका हा विविध खेळांसाठी जगाच्या इतिहासात नावलौकिक झालेला असेल.
की
प्रथम पारितोषिक ७१ हजार रुपये — एच. के. संघ, इंदापूर,
द्वितीय पारितोषिक ५१ हजार रुपये — मगराचे निमगाव संघ,
तृतीय पारितोषिक ३१ हजार रुपये— दहिवडी संघ,
चतुर्थ पारितोषिक २१ हजार रुपये— नातेपुते ,संघ
अशा स्वरूपात बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.श्री. अभिजीत अवघडे यांनी युवा पिढीमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हे सामने आयोजित केले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे तालुक्याचे नायब तहसीलदार मा. ठोंबरे साहेब , युवा उद्योजक, मा.सागर अरगडे,युवा नेते मा. अजिंक्य जाविर, मा.भाऊसाहेब शिंदे, मा. सागर गानबोटे, मा. ललेंद्र शिंदे, मा. संतोष देवकर, मा. असिफ भाई बागवान., मा. संदिप चव्हाण, मा. अमित जौंजाल, मा. धीरज शाह, तसेच आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सर्वांचे आभार श्री.राजू शेख यांनी मानले. तर निरोप समारंभ श्री. पप्पू केंगार यांनी केला.
या स्पर्धेचे आयोजन युवा नेतृत्व श्री. अभिजित अवघडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.अभिजित अवघडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.इंदापूर शहरातील ही स्पर्धा चर्चेचा विषय ठरली. इंदापूर तालुक्यातील जनतेने या स्पर्धेचा विनामूल्य आनंद घेतला.