शिक्षक भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत करण्याच्या हालचाली सुरू?
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क:
दि.२२: मुंबई – शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.शिक्षक भरतीमध्ये होणारे घोटाळे,निर्माण होणाऱ्या अडचणी यामुळे लांबणीवर पडलेली शिक्षक भरती प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी राज्यभरातून सुरू होती.याच पार्श्वभूमीवर शिक्षक भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्याच्या शिक्षण आयुक्तालायाकडून तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शिक्षण विभागाचे विशेष प्रयत्न सुरू आहेत.जर शासनाने प्रस्तावाला मान्यता दिली तर आगामी शिक्षक भरती एमपीएससी मार्फत करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असणार आहे.
२०१२ नंतर शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही. २०१९ ला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून १२ हजार शिक्षकांची भरती झाली होती. मात्र या पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या, अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.त्यानंतर ही शिक्षक भरती प्रक्रिया कशी राबवायची त्यानुसार एमपीएससीने भरती करावी, असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.एमपीएससीचे अधिकारी सुद्धा याबाबत सकारात्मक आहे.