नीरा भीमा लवकरच टॉप टेन मध्ये तर विरोधकांच्या प्रत्येक टीकेचे उत्तर २०२४ मध्ये कळेन- मा.सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील
शहाजीनगर/इंदापूर शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.२३ शनी: नीरा भीमा सह. साखर कारखाना लि.शहाजीनगर ता.इंदापूर जि.पुणे यांच्या संयुक्त कारखान्याच्या २१ व्या ऊस गळीत हंगाम २०२१-२२ चा यशस्वीरित्या ७ लाख १७ हजार ६५०मे. टन गाळप पूर्ण केल्याबद्दल सर्व कामगार, ऊस वाहतूकदार, ठेकेदार यांचा स्नेह मेळावा समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक निरा भीमा सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये निरा भीमा सह.साखर कारखान्याचे संचालक श्री. राजवर्धन पाटील हे उपस्थितीत होते.
त्यावेळी श्री.हर्षवर्धन पाटील म्हणाले की, हा कारखाना चालवित असताना अत्यंत कठीण प्रतिकूल परिस्थितीत सर्वांनी सहकार्य केले.त्यांनी त्यांनतर सर्वप्रथम कामगारांचे अभिनंदन केले.प्रयत्नांची पराकाष्ठा संचालक मंडळांनी केली त्यामुळे आजचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडला.या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण ४४ गावे आहेत. बऱ्याच अथक प्रयत्नानंतर या माळरानावर नंदनवन फुलले आहे.
पुढे विरोधकांवर टीका करताना म्हणाले की,मी लबाड आहे का आणखी कुणी हे २०२४ ला कळेन.कारखान्याच्या कामकाजात अडथळा निर्माण करून तक्रारी करून दोन्ही कारखाने बंद पडण्याचा विरोधकांचा डाव आहे .विरोधकांनी कुठलीही मदत न करता कारखान्याच्या कामात अडथळा आणले.स्व गोपीनाथ मुंडे,स्व.विलास देशमुख यांनी हा कारखाना उभा करण्यासाठी खूप मदत केली.नीरा भीमा सर्वांगाने सक्षम झालेला दिसून येतो.२०१४ पासून मी कुठल्याही पदावर नाही. परंतु १९५२ पासून ७५ वर्ष तुम्ही आम्हाला लोक प्रतिनिधी म्हणून निवडून दिल्याबद्दल आभारी आहे.
दैनंदिन गाळप सरासरी सरासरी ५० टक्क्यांपर्यंत गेली पाहिजे.माती परीक्षण व पाण्याची तपासणी करावी लागेल.सहकारातील कारखानदारी टिकली तर आपले प्रपंच टिकतील.तुम्ही साथ द्या येणारा भविष्यकाळ आपलाच आहे.१२टक्के पगारवाढ कामगारांना केले आहे.
यानंतर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार उदय पाटील,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. उदय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन निरा भीमा कारखान्याचे संचालक श्री. चंद्रकांत भोसले यांनी केले.