घराचाच वाढपी! इंदापूर तालुक्यासाठी अडीच वर्षात २०००कोटी! राज्यमंत्री भरणे यांनी घडवला भूतो न भविष्य इतिहास!

पळसदेव- बिजवडी जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उदघाटन समारंभ.

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आजमितीला श्री. भरणे यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्या पासून त्यांनी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तालुक्यासाठी निधी आणला. असे करता करता त्यांनी सन मे २०२२अखेर विकासाचा आकडा २००० कोटिकडे घेऊन गेले आहेत.

राज्यमंत्र्यांनी सदरचा निधी मग तो राज्य शासनाचा असेल नाही तर  तो केंद्र वेगवेगळ्या खात्यातून इंदापूर तालुक्यासाठी वर्ग करून घेतला. त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्नांतून तो तालुक्यासाठी वळीवला देखील. मग तो निधी केंद्र शासनाचा असो अथवा राज्य शासनाचा!

कारण कुठल्याही नेत्याने आपल्या मतदारसंघासाठी काय केले याचा जाब जनता आताच विचारत नाही तर त्याचे उत्तर ते मतदानाच्या स्वरूपात देतात. राज्यमंत्री भरणे यांनी आपल्या कामामध्ये सामान्य माणसाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे,म्हणूनच इंदापूरच्या इतिहासात २०००कोटींचा निधी आणला.

आज पळसदेव- बिजवडी जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उदघाटन समारंभ आहे.सुमारे ९७ कोटी २४ लाख रुपयांची विविध विकास कामांचे भूमिपूजन,उद्घाटन समारंभ व जाहीर सभा असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या गटातील सर्व गावांना निधीचा लाभ घेता येणार आहे.या कार्यक्रमाची जाहिर सभा आज शनिवार दि.२१ मे २०२२ रोजी सायं ६.००वा.पळसदेव इंदापूर येथे आयोजित केली आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.प्रदीप गारटकर असणार आहेत.

प्रमुख उपस्थिती श्री.प्रवीण माने,श्री.प्रताप पाटील,श्री.श्रीमंत ढोले सर ,श्री.दीपक जाधव, प्रशांत पाटील,श्री.अभजित तंबिले, श्री.हनुमंत कोकाटे, श्री.सचिन सपकळ, बापूराव शेंडे,श्री. बाळासाहेब काळे,श्री.अमोल भिसे,श्री.अतुल झगडे,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

इंदापूर तालुक्यातील एक ना एक गाव विकासापासून वंचित राहिला नाही पाहिजे. हा तालुका आणखी सुजलाम् सुफलाम् व्हावा. अशी आशा राज्यमंत्री भरणे यांनी मनोकामना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!