उजनी@ ४५.१८ टक्के प्लस शेतकरी आनंदात!
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
शिवाजी शिंदे /प्रतिनिधी/इंदापूर: जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात आपली दमदार हजेरी लावली, त्यामुळे चिंतेत असणारा महाराष्ट्र चिंतामुक्त होताना दिसत आहे.परंतु काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे.
पुणे शहर व परिसरातील धरणे तुडुंब भरल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातच खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
आजमितीला उजनी धरणात ४५.१८ टक्के इतका साठा झाला आहे. सदरची नोंद आज दि.१८ जुलै २०२२ रोजी सकाळी ६.००वा.ची आहे.उजनी धरण जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.उजनी परिसरात पावसाने चांगली लावलेली होती. त्यामुळे दुबार पेरणीची नामुष्की टळली आहे.