हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भोडणी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण!

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भोडणी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

– नवीन ग्रा.पं. कार्यालयाचेही भूमिपूजन

इंदापूर: प्रतिनिधी दि.०९/०८/२०२२

भोडणी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि.८) उत्साही वातावरणामध्ये करण्यात आले. भोडणी गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन वर्गखोल्या (रु. ७.५ लाख), प्राथमिक शाळा दुरुस्ती (रु. ३ लाख ), नवीन आर.ओ.प्लांट (रु. ३लाख ) या कामांचे लोकार्पण तसेच भोडणी ग्रामपंचायतीसाठी रु. १५ लाख रु.खर्चून बांधण्यात येणाऱ्या नवीन कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते करण्यात आले. आगामी काळातही गावच्या विकासासाठी आणखी निधी दिला जाईल, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी संगितले. सदरच्या कामांसाठी पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांचे सहकार्याने निधी उपलब्ध झाल्याचे यावेळी भाषणात संतोष जगताप यांनी सांगितले. प्रास्ताविक ग्रामसेवक पी. के.अबनावे यांनी केले. यावेळी निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष व भाजप नेते रंजनकाका तावरे, ग्रा.पं. सरपंच धनश्री जगताप, उपसरपंच मल्‍हारी लोखंडे, अनिल चव्हाण, माणिकराव खाडे, राजू भोंगळे, कैलास हांगे, राजेंद्र देवकर, अण्णा गोसावी, विजय खटके, बबन खाडे, वैजनाथ हांगे, अभिजीत खोरे, सर्व ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते. आभार संतोष जगताप यांनी मानले.

___________________________

फोटो:- भोडणी (ता. इंदापूर) येथे विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!