भिमाई आश्रमशाळेत ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा.
भिमाई आश्रमशाळेत ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा.
इंदापूर :- (दि.५) मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आणि मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा झाला.
संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे तात्यांच्या प्रतिमेस व समाधीस्थळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी ॲड. समीर मखरे म्हणाले की, अशोक विजयादशमी दिवशी तथा दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौध्द धम्माचे चक्र डॉ.आंबेडकरांनी गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केले,तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र अनुवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.असे यावेळी ॲड.मखरे यांनी नमूद केले. यावेळी सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे संचालक गोरख तिकोटे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, अधिक्षक लता सातपुते, अनिसा मुल्ला, निता भिंगारदिवे, अनिल ओहोळ, सर्व विद्यार्थी आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी उपस्थित होते.