नागेश्वर मंदिर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांचे रेडा येथे पवार कुटुंबियाच्या वतीने केले जोरदार स्वागत

चहापाणी, फटाक्याच्या अतिषबाजी, स्वागताने वारकरी गेले भारावून!

चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

इंदापूर प्रतिनिधी:कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातून आणि देशातून तमाम लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी, जात असतात. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील, श्रीगोंदा तालुक्यातील कौठा गावातून श्री नागेश्वर मंदिर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा गेली ४५ वर्ष  पायीवारी करत आहे.हा पायी दिंडी सोहळा (दि ३० )आँक्टोबर रोजी रेडा ता.इंदापूर या ठिकाणी आल्या नंतर पवार परिवाराकडून या दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.रेडा गावातील पवार कुटुंबांच्या वतीने दिंडी सोहळ्यातील सहभागी वारकऱ्यांच्या चहापाणी,नाष्टा,फराळाची  सोय केली होती.गेली अनेक वर्षापासून पवार कुटुंबिय मोठ्या आनंदाने वारकरी बांधवांची सेवा करत असते.

गुरुवर्य ह.भ.प. निवृत्ती शिपलकर व वैकुंठवासी गुणाईमाता शिपलकर यांच्या प्रेरणेने, वैकुंठवासी गुरुवर्य ह. भ. प. रामदास महाराज सोनवणे(बीडकर) यांच्या कृपाशीर्वादाने गेली ४५ वर्ष हा दिंडी सोहळा पायवारी करत असून कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या चरणाच्या दर्शनाकडे आस लावून ऊन, वारा, पाऊस, थंडी याचा विचार , तमा न करता पंढरपूर दिशेने जात असतो.गुरुवर्य ह.भ.प.दातीर महाराज (काष्टीकर) गुरुवर्य ह. भ. प. हरी महाराज घोडके (देवळेकर) हे या दिंडी सोहळ्याचे नियोजन करत असतात. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी श्री नागेश्वर मंदिर कौठा येथून या दिंडीचे प्रस्थान होत असून आठ दिवस दरमजल प्रवास करत ही दिंडी सोहळा (दि.२) नोव्हेंबर रोजी पंढरपूर मध्ये दाखल होतो.कौठा येथून निघालेला हा दिंडी सोहळा खडकी, डाळज नं.-२, मुक्ताबाईचे शेळगाव, रेडा, माळवाडी, तोंडले -बोंडले, पंढरपूर, सराफवाडी, भिगवण, कळस, फलटणकर मळा, गोडलिंब, म्हसोबावाडी ग्रामस्थ, बंडिशेगांव, खारतोडे वस्ती, विकास वाडी, खंडाळी, नागेश्वर मंदिर असा हरिनाम जयघोष करत कार्तिक शु. नवमी ते कार्तिक शु.द्वादशी पर्यंत चार दिवस पंढरपूर येथे मुक्कामी असतो.

रोज संध्याकाळी प्रवचन, कीर्तन, भजन, अन्नदान असा दिनक्रम असतो  या दिंडी सोहळा मध्ये वारकरी स्वतःचा बिछाना सोबत घेऊन शिस्तबद्ध  पद्धतीने पंढरपूर हे रवाना होतो. दिंडीचे विनेकरी म्हणून कुमार काका कुलकर्णी, मारुती राहींज तर चोपदार हनुमंत नारायण शिपलकर सर्व नागेश्वर भक्त मंडळ व्यवस्थापन करत असते.गेले तीन दशकाच्यावरती रेडा गावातील रेडा ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुखदेव तुकाराम पवार व पवार कुटुंब या दिंडी सोहळ्याचे व येणाऱ्या वारकऱ्यांची मोठ्या मनोभावेने सेवा करत असतात. दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक दामाजी एक्सप्रेसचे निर्भिड पत्रकार कैलास पवार दिंडी सोहळ्या सोबत आलेल्या वारकऱ्यांना फेटे बांधून त्यांचे स्वागत करत असतात.रेडा गावातील पवार कुटुंब आणि त्यांचा सर्व परिवार हे मोठ्या भक्ती भावाने वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात. गेली अनेक तीन दशकाच्या वरती ही परंपरा त्यांनी जपलेली आहे.अशी दिंडी सोहळ्याचे प्रमुख व वारकरी, महिलांनी प्रतिक्रिया दिल्या.सदर सर्व दिंडी संदर्भातील माहिती ह.भ.प. दत्तात्रय शिपलकर महाराज, ह. भ. प. सोमनाथ महाराज शिपलकर ,यावेळी ह.भ. प. भानुदास दातीर,ह.भ.प.हरि घोडके महाराज, ह. भ. प. कुमार काका कुलकर्णी, चोपदार ह.भ.प. हनुमान शिपलकर, ह. भ. प.संजय कुदळे, पांडुरंग मचाले, बाळासाहेब हाके, ह. भ. प. वामन राहींज,  ह. भ. प. बबन पवार महाराज (टेलर) व रेडा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!