लेंड ए हॅण्ड इंडिया,पुणे व शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता चाचणी यशस्वी
इंदापूर (प्रतिनिधी):
३ मे २०२३ रोजी लेंड ए हँड इंडिया, पुणे व शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. ना. रा. हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता कल चाचणी घेण्यात आली. या ४ तासाच्या चाचणी साठी १४९ विद्यार्थी उपस्थित होते.
८ मे २०२३ रोजी “मानसिक क्षमता कल चाचणी” चा निकाल विद्यार्थी व त्यांच्या पालक यांना देण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करण्यात आले. सर्वांचे समुपदेशन झाल्यांनतर विद्यार्थी व पालक यांच्या असणाऱ्या शंकांचे निरसन करण्यात आले. या समुपदेशन कार्यक्रमासाठी १४९ विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यासाठी पुणे येथून संगीता निंबाळकर, मनीषा साठे, चंद्रकांत निंबाळकर उपस्थित होते. तसेच या प्रसंगी शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट चे खजिनदार व अल्फा बाईट चे प्राचार्य श्री. तुषार रंजनकर , ट्रस्टचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख श्री. महादेव चव्हाण सर, शंकरराव पाटील कोपिवरची शाळा चे प्रमुख श्री. भारत बोराटे सर, ट्रस्टचे सल्लागार श्री. हमीदभाई आत्तार, अल्फा बाईटच्या इन्चार्ज चारुशीला शिंदे मॅडम, ट्रस्टचे इन्चार्ज दिपक जगताप तसेच दोन्ही संस्थेचे कमर्चारी उपस्थित होते.