इंदापूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील परिसर केला स्वच्छ

इंदापूर( प्रतिनिधी): इंदापूर महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात . दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत इंदापूर मधील उपजिल्हा रुग्णालय परिसरातील स्वच्छतेची मोहीम हाती घेतली .

 यावेळी उपस्थित उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ली डॉ . सोमनाथ खाडे , परकाळे सर, सोलापूर सर , घुले सिस्टर , नवगिरे सिस्टर कोकरे व इतर कर्मचारी उपस्थित होते .

  डॉ.खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की’, महाविद्यालयीन युवक हे समाजाचे प्रतिनिधित्व करत असतात .त्यांनी जर स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून सांगितले असता सामाजिक विकासास मदतच होते .समाजातील प्रत्येक व्यक्तीने आरोग्याची काळजी घेत असताना स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे . महाविद्यालयीन जिवनातील संस्कार हे विद्यार्थ्याच्या आयुष्याला दिशा दर्शक ठरतात.

  या उपक्रमात महाविद्यालयातील २१५ विद्यार्थ्यांनी रुग्णालय परिसरात असणारे गवत, प्लास्टिकच्या बॉटल , इतर वकचरा स्वच्छ करण्याचे काम केले .

   या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .जीवन सरवदे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देवुन उपक्रमा साठी शुभेच्छा दिल्या .

या उपक्रमात एन .एस .एस विभाग प्रमुख प्रा . उत्तम माने ,डॉ भिमाजी भोर , प्राध्यापिका गायकवाड मॅडम , प्रा .साठे ,एन.सी.सी विभागाचे प्रमुख डॉ . सुरेंद्र शिरसट व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. तानाजी कसबे, व तिन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!