इंदापूर विधानसभेच्या रिंगणात मनसेचे अमोल देवकाते यांचा उमेदवारी अर्ज दाखल

इंदापूर (प्रतिनिधी)- इंदापूर विधानसभेच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपला उमेदवारी अर्ज अमोल देवकाते यांच्या मार्फत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड .सुधीर पाटसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  अर्ज दाखल केला.

अमोल देवकाते यांनी आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. आपकडून इंदापूर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, परंतु गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुणे जिल्हा आपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.आणि उमेदवारी देखील देण्यात आली आहे.

 इंदापूरसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ही पहिलीच निवडणूक लढवली जात आहे.तालुक्यातील चुरशीच्या या लढाईमध्ये मनसेची उडी कोणासाठी डोकेदुखी ठरेल हे सांगता येणार नाही. राज ठाकरे आपल्या उमेदवारासाठी इंदापूरच्या रणांगणात येतील का? आणि पाठबळ देतील का? जर आले तर षटकारवर षटकार मारतील का? याचे वेध इंदापूरकरांना लागले आहेत.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुधीर पाटसकर, रामभाऊ काळे, संतोष भिसे, सुरेश व्यवहारे,राजु भोंग, राजेंद्र हजारे,ॲड.नितीन राजगुरू, वैभव देवकर, प्रदिप रकटे, तुकाराम पारेकर, अमोल रेडके,लता देवकाते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!