कालठण १चे हनुमंत जाधव हे शिवसृष्टी कला क्रीडा व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित!

इंदापूर(प्रतिनिधी):- कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. श्री.हनुमंत भाऊ जाधव यांना शिवसृष्टी कला क्रीडा व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले प्रयेक यशामागे संघर्ष हा असतोच. संघर्षातून जन्माला आलेले यश हे नक्कीच प्रेरणादायी असते. त्यांची राजकीय क्षेत्रातील कामगिरी आणि समाजसेवा अनमोल असल्याने त्यांचा हा सन्मान करण्यात आले असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष धनंजय कळमकर पाटील यांनी व्यक्त केले .

यावेळी ते म्हणाले की, त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन कला क्रिडा व शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की हनुमंत भाऊ जाधव यांनी कालठण नंबर एक या छोट्याशा गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत ग्रामपंचायत यशस्वीरित्या निवडणूक लढवून व पॅनल टाकून जिंकून आणली महिलेला सरपंच पदाचे स्थान दिले त्यांनी गावाचा आराखडा तयार करून गावाला उत्कृष्ट असे लोक वर्गणीतून काळभैरवनाथ मंदिराची यशस्वीरित्या उभारणी केली व आदर्श मंदिर गाव निर्मान केले,

उपमुख्यमंत्री मा.अजित पवार हे विरोधक असून सुद्धा एका ठिकाणी जाताना त्यांनी त्या मंदिरात भेट देऊन सरपंच व कार्यकर्त्यांचे मंदिराबाबत कौतुक केले व इतर गावांनी ही त्यांचा आदर्श घ्यावा असे गौरवोद्गार काढले.

 कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांनी जातीपातीचे अथवा खोडसाळपणाचे राजकारण न करता कारखान्याच्या हितासाठी सर्वांनी आपला ऊस कर्मयोगी शंकराव पाटील सहकारी साखर कारखान्याला द्यावा असा प्रचार करून कारखान्यांना ऊभारी देण्याचे कार्य केले.

 अनेक गरजूंना मदत करून शेतकरी कुटुंबातील हनुमंत भाऊ जाधव यांनी अनेक गोरगरीब व शाळकरी मुलांना सहकार्य केले आहे विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात एक आदर्श निर्माण करून दिला.राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत म्हणून त्यांना हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे,

या वेळी इंदापूरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार उपस्थित होते.गावातील अनेक मान्यवर या वेळी उपस्थीत होते. तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हमीदभाई आत्तार यांनी सुत्रसंचलन तर आभार महादेव चव्हाण सर, व कार्यक्रमाचे आयोजन कालठण नंबर एक येथे करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!