श्रीराम सोसायटी येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी!
श्रीराम सोसायटी येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
पुणे, प्रतिनिधी
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि अभिमानपूर्वक साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन स्व. अमोल सोन्या सोनटक्के मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. प्रमुख निमंत्रक म्हणून नागेश भाऊ गायकवाड (पुणे जिल्हा सरचिटणीस, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा) यांनी पुढाकार घेतला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. कृष्णा ताटे सर यांनी भूषवले, तर उद्घाटन सचिन भाऊ आरडे (प्रदेश सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा) यांच्या शुभहस्ते पार पडले.
कार्यक्रमास ललेंद्र शिंदे (जिल्हाध्यक्ष, मातंग एकता आंदोलन), संदिपान कडवळे (आर. पी. आय.), अंकुश भाऊ गायकवाड, रवी शेठ भिसे, दीपक साळुंखे, प्रकाश खिलारे, दिलीप मखरे, धनाजी शिंदे, आकाश भाऊ कसबे, तोरणे अण्णा, लहू अण्णा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांच्या विचारधारेचा गौरव करत, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले. सामाजिक समतेचा विचार आणि संघर्षमय जीवनाची उजळणी करत अनेकांनी अभिवादन केले.
यावेळी भीमराव आरडे, भूषण माने, विकास धोत्रे, ओम खिलारे, पिंटू शिंदे, लखन पंडित, धनु कळसाईत, प्रतीक सोनटक्के, राज शिंदे, पांडुरंग काळे, हर्ष लोखंडे, आतुल जाधव, सोनू गुप्ते हे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन आणि आभारप्रदर्शन नागेश भाऊ गायकवाड यांनी केले.