वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे इंदापूरात जल्लोषात स्वागत
इंदापूर (प्रतिनिधी):
वंचित बहुजन आघाडीचे ज्वालाग्राही नेते आणि ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे पंढरपूर दौऱ्यावर असताना वेळ काढून इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाक्याजवळ थांबले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
वंचित बहुजन युवा आघाडीचे इंदापूर तालुका अध्यक्ष किर्तीकुमार वाघमारे यांनी बाळासाहेबांना पेन भेट देऊन त्यांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी तालुक्यातील युवा आघाडीचे उपाध्यक्ष उमेश मोरे, महासचिव संतोष चव्हाण, सचिव प्रीतम कांबळे, तसेच आकाश चव्हाण, फिनेल चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक कार्यकर्त्याची तब्येत विचारून आत्मीयता दाखवली. पुढे बोलताना त्यांनी “इंदापूर तालुक्यात पक्ष अधिकाधिक बळकट करण्यासाठी एकसंघ काम करा” असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
या छोट्याशा भेटीद्वारे वंचित बहुजन कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, इंदापूर तालुक्यात पक्षसंघटना अधिक जोमाने कार्यरत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.